विंझर -२
कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील एसेक्स परगण्याचे मुख्य ठाणे व प्रसिद्ध नदीबंदर. लोकसंख्या २,६२,०७५ (१९९१). हे ईअरी व सेंट क्लेअर या सरोवरांना जोडणाऱ्या डिट्रॉइट नदीच्या डाव्या तीरावर वसलेले असून याच्या समोरच नदीच्या दुसऱ्या तीरावर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील डिट्रॉइट हे प्रसिद्ध शहर आहे.